पोक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या

---Advertisement---

 

Pune News : पोक्सोच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत चादरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात घडली.

रवींद्र व्यंकट गार्डी, बारामती असे कोठडीत गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र गार्डीने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली होती. फलटण तालुक्यातील डॉ. नरुटे हॉस्पिटल येथे बेकायदेशीरपणे या मुलीचा गर्भपात करण्यात आला होता.

हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्यावर २४ एप्रिल रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. गार्डीला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवार, २८ एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास कर्तव्यावरील पोलिस गार्ड फ्रेश होण्यासाठी गेले असता आरोपीने पांघरायला दिलेल्या चादरीने दोरखंड तयार केला व गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला तत्काळ होळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---