जळगाव : थर्टी फस्ट व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे मद्य प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन करण्यात आले होते. तरी नववर्षांच्या पूर्वसंध्येला 132 मद्यपी चालकांवर कारवाई केली. ही कारवाई जळगाव शहर वाहतूक शाखा व पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली. या कारवाईअंतर्गंत 26 नागरिकांनी दोन लाख 60 हजार रुपये दंड भरला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातच नव्हे तर देशभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे तसेच पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. थर्टी फस्टला मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर जळगाव शहरात विविध परिसरात कारवाई करण्यात आली.
हि कारवाई वाहतूक शाखा व जळगाव शहरातील पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत करण्यात आली. या कारवाईत १३२ तळीरामांना पकडण्यात आले. या सर्वांवर न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वाहतूक शाखेने ५० तळीरामांवर न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणानुसार २६ नागरिकांनी दोन लाख ६० हजार रुपये दंड १ जानेवारी रोजी भरला आहे
वाहतूक शाखेने ५० तळीरामांवर न्यायालयात खटले दाखल केले असून, त्यापैकी २६ नागरिकांनी १ जानेवारी रोजी एकूण दोन लाख ६० हजार रुपये दंड भरला आहे. जळगाव शहर वाहतूक शाखेने २०२ २ मध्ये २१९ , २०२३ मध्ये १ तर २०२४ मध्ये १९९ प्रकरणे दाखल असल्याचे नोंद आहे. यामध्ये ५ प्रकरणे ३१ डिसेंबर तर १४ गुन्हे दाखल झाले होते. या खटल्यांपैकी १४० नागरिकांनी दंड भरलेला आहे