मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगावमध्ये नोंद; प्रशासन अलर्ट मोडवर

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून तापमान वाढत असल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, कडाक्याच्या उन्हाच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक काम असल्यास पूर्ण खबरदारी घेऊनच बाहेर पडावे तसेच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

वाढते तापमान आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुघे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---