---Advertisement---
जळगाव : ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्याचे वितरण ॲड.बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या प्रागंणात एका भव्य कार्यक्रमात करण्यात आले एकुण ७००० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वहया, दोन पेन, दोन पेन्सिल, शॉपनर, खोउखर असे साहित्य वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास माजी मंत्री सुरेशदादा जैन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा व विष्णु भंगाळे, उद्योजक रजनीकांत शाह, भागवत भंगाळे, महेंद्रशेठ शाह, योगेश कलंत्री, विनय बाहेती, सुप्रिम इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक सुरेश मंत्री व ज्ञानदेव महाडीक, ॲड. राजेंद्र माहेश्वरी, माजी नगरसेवक विजय वाणी, क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव अँड. रोहन बाहेती, ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. करीम सालगर, विपुल पारेख यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांनी विद्येची देवता सरस्वती माता व स्व. बबन भाऊ बाहेती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्व. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शाम कोगटा यांनी कार्यक्रमाचे हे 33 वे वर्ष असून यामाध्यमातून शहरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत असून या विद्यार्थ्यांनां’ शिक्षणात या साहित्याची मोलाची मदत होत असून सुरेशदादा जैन व ना. गुलाबराव पाटील यांचे प्रेरणेने व सहकार्याने ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यत आमचा सहभाग’ निश्चीत राहील व त्यासाठी कितीही अडथळे आले तरी ते या गरजू विद्यार्थ्यांसाठी पार केले जातील यासह दानशूर व्यक्तीचे आभार व्यक्त केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात शामभाऊ कोगटा यांनी 33 वर्षापासून लावलेले हे रोपटे वटवृक्षांत रुपांतरित झाले असून गरजवंत विद्यार्थ्यांसाठी शामभाऊ काहीही करण्यास तयार असतात त्यांच्या या अनमोल कार्याचे कौतुक करून भविष्यात त्यांना अश्या कार्यासाठी कायम सहकार्य राहील असे विचार व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत शामभाऊ कोगटा, मा. नगरसेवक मनोज चौधरी, मा. नगरसेवक राजु मोरे, पवन ठाकूर, रमेश माळी, रोहित कोगटा, किरण राजपूत, आनंद महागडे, विजय पाटील, कैलास चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर मनोज चौधरी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्व. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठाण, क्रीडा रसिक स्पोर्टस क्लब यांचे पदाधिकारी व सदस्य सहकार्य लाभले.