---Advertisement---
जळगाव : सीमा नाफडे या महिलेने केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी फेटाळून लावले असून एफआयआर नोंदवणाऱ्या या महिलेविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली. त्या गुरुवारी ( ४ जुलै ) रोजी त्यांच्या जळगावातील निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटनांसदर्भात पिडीत व्यक्तीला न्याय न देता सत्ताधारी पक्षांकडून त्यांचेच पदाधिकारी कार्यकत्यांना संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा या त्या पदाला लायक नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.
---Advertisement---
दोन दिवसापूर्वीच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजकीय हेतूने प्रेरीत होवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडेची पत्नीचा छळ केला जात असल्याचा आरोप केला. यासंदर्भात एफआयआर नोंदवणाऱ्या सीमा नाफडेविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगीतले.
गुरूवारी 2 जुलै रोजी जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडे याच्याकडून पत्नीचा छळ केला जात असून, रोहिणी खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा पांडुरंग नाफडे याची पत्नी सीमा नाफडे हिने आरोप केला. यासंदर्भात राजकीय दबावामुळे पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल केला जात नसल्याचेही सीमा नाफाडे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली.
गेल्या काही दिवसापूर्वी पुण्याच्या वैशाली हगवणे बळी प्रकरणी महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून कोणत्याही प्रकरणाला न्याय देण्यात आला नाही. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा या पदाला लायक नसून त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहीजे अशी मागणी केली. केवळ राजकीय हेतूने प्रेरित होवून त्यांनी माजी पीएची पत्नी सीमा नाफडेचा राजकीय वापर करीत त्यांनी फैजपूर येथे एफआयदाखल केली. जळगाव दौऱ्यावर असताना सीमा नाफडेची भेट घेत पोलीस अधीक्षक कार्यालयात एका राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून प्रशासनावर दबाव आणला. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांनी दखल द्यावी, असेही ॲड रोहिणी खडसे यांनी सांगीतले.