---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरी सुद्धा त्यांच्यावर मनपा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने आज गुरुवारी (२४ जुलै) रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून डॉ. घोलप यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्या गैरवर्तवणुकीचे अनेकबाबी उघड झाले आहेत. असे असताना त्यांना मनपा सेवेतून बडतर्फ करण्यात येत नसल्यामुळे शिवसेनेचे कुलभूषण पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्त ढेरे यांच्यावर संताप व्यक्त केला. डॉ. विजय घोलप यांच्या गैरवर्तुणीकीबाबतचा चौकशी अहवाल आल्यानंतर सुद्धा कार्यवाही होत नसल्याने शिष्टमंडळाने आयुक्तांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी शिष्टमंडळाने आरोग्य अधिकाऱ्यांना बडतर्फे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्यचा इशारा कुलभूषण पाटील यांनी दिला.
---Advertisement---

यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर प्रमुख एजाज मलिक, काँग्रेस पक्षाचे महानगर प्रमुख शाम तायडे, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, आरपीआय आठवले गटाचे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, युवासेना जिल्हाप्रमुख पीयुष गांधी, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, माजी शहर संघटक राजेंद्र पाटील, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, विजय राठोड, किरण भावसार, जितू बारी, सचिन चौधरी, योगेश पाटील, लोटण सोनवणे, ज्ञानेश्वर शेकाकुरे, भिमराव पांडव, गुलाब कांबळे, विशाल कोळी, किरण ठाकूर, प्रभाकर कोळी, बापु मेणे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.