Amalner Assembly Constituency ‘या’ मुहूर्तावर मंत्री अनिल पाटील दाखल करणार नामांकन, जाणून घ्या तारीख !

अमळनेर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २८८ जांगांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. आज २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, बहुतांश उमेदवार हे अर्ज भरण्यासाठी मुहूर्त निवडत आहेत. कालाष्टमी आणि गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे अनेक उमेदवारांनी गुरुवारी २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पसंती दिली आहे. तर काही उमेदवारांनी २८ ऑक्टोबरला वसुबारस आणि २९ला धनत्रयोदशी असल्याने त्या दिवसाची निवड केली आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ना.अनिल भाईदास पाटील हे देखील मुहूर्तावर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंत्री अनिल पाटील हे महायुतीतर्फे घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महाशक्तिप्रदर्शन करत उमेदवारी भरणार अर्ज आहेत.

    मंत्री अनिल पाटील हे २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील मंगळ ग्रह मंदिर येथून रॅलीला सुरवात होणार आहे.याप्रसंगी प्रदेश राष्ट्रवादी कडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर याव्यतिरिक्त जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ व जिल्ह्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महारॅली पैलाड चौफुली,दगडी दरवाजा, तिरंगा चौक, बस स्टँड, महाराणा प्रताप चौक मार्गे तहसील कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे. मंत्री अनिल पाटील व महायुतीतर्फे या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण मतदारसंघात होम टू होम निमंत्रण देण्यात आले आहे. प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती अशी ही महारॅली निघेल अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

         अनिल पाटील यांची उमेदवारी म्हणजे मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारी आणि मतदारसंघाची अस्मिता जागविणारी असल्याने यावेळी महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप,शिवसेना,रीपाई (आठवले गट) चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील समस्त नागरिक व हितचिंतकांनी य मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.