Amalner Assembly Election : अमळनेर मतदारसंघात महायुतीचाच ‘झेंडा’; बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार

अमळनेर प्रतिनिधी : मंत्री अनिल पाटील यांचा अमळनेर विधानसभा मतदार संघ आहे. यात राष्ट्रवादी पक्षाने आपली पकड मजबूत केली आहे. या मतदार संघांत २००९ , २०१४ साली अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. तर २०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांत केवळ अमळनेर विधानसभा मतदार संघांत राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांनी विजय मिळवला. मात्र, कालांतराने राष्ट्रवादी पक्षात फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेला राष्ट्रवादी पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाला. यात मंत्रिमंडळात, अनिल भाईदास पाटील यांची वर्णी लागली. अमळनेर विधानसभा विधानसभा मतदार संघांत राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना रंगण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकविणार, असा निर्धार मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत महायुतीचे घटक, पक्ष असलेल्या भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पवार, शहराध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटिक यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा लावण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. महायुतीच्या विजयासाठी व्यूहरचना काय असावी याबाबत सर्वांची मते जाणून घेण्यात आली.
कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करू मजबूत संघटन हीच आपली ताकद अमळनेर मतदारसंघात महायुतीचे मजबूत संघटन असल्याने प्रमुख तिन्ही संघटना व इतर सहकारी पक्ष संघटनेचे सर्व कार्यकर्ते हीच आपली ताकद असून या ताकदी समोर विरोधकांचा टिकाव लागणार नाही, केवळ मतदान होईपर्यंत दिलेली जबाबदारी प्रत्येकाने काळजीपूर्वक सांभाळा कोणत्याही परिस्थितीत विजय आपला निश्चित आहे, असे मत मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले.


तसेच सर्व कार्यकत्यांना क्रियाशील करत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत केलेल्या विकास कामाची गंगा पोहोचून विजयाची माळ आपल्या महायुतीच्याच उमेद्वाराच्या गळ्यात कशी पडेल? यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही सर्वानी म नोगतातून व्यक्त केली. यावेळी भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शीतल देशमुख, अॅड. व्ही. आर. पाटील, श्रीनिवास मोरे, संदीप पाटील, उमेश वाल्हे, प्रकाश पाटील, कैलास पाटील, महेंद्र पाटील तसेच राष्ट्रवादीचे विनोद कदम, शिवाजी पाटील, राजेश पाटील, गिरीश पाटील, विवेक पाटील, रामकृष्ण पाटील, सुरेश पाटील, सम ाधान धनगर, प्रवीण पाटील, भूषण भदाणे, बाळू पाटील, पंकज साळी. गौरव पाटील, इम्रान खाटिक, दिनेश शेतकरी, सनी गायकवाड, अभिषेक धमाल, गिरीश उदयवाल, सुशील पवार, प्रीतम पाटील, शुभम बोरसे, तारकेश्वर गांगुर्डे, सुनील पवार यांच्या सह आजी-माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.