---Advertisement---

Amalner Crime News : महिलेसह तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ, तिघांविरोधात गुन्हा दाखल

by team

---Advertisement---

अमळनेर : तालुक्यात एका धक्कादायक घटना उघड झाली आहे.  दारुच्या नशेत असलेल्या एकाने महिला, तिची जेठानी व सासऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने शिविगाळ तसेच महिलेच्या सासऱ्यांना लाकडी काठीने मारहाण देखील केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही मारहाणीची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७. ३० वाजता घडली. याप्रकरणी शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मारवड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील वासरे गावात निकिता निलेश पाटील (वय २१) या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता गावातील विलास माधव पाटील, संदीप विलास पाटील व मिनाबाई विलास पाटील यांनी निकिता पाटील यांच्यासह त्यांचे सासरे शंकर रघुनाथ पाटील व जेठाणी श्वेता पाटील, यांना शिवीगाळ केली. तसेच महिलेचा सासऱ्यांना लाकडी काठीने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी निकिता पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विलास माधव पाटील, संदीप विलास पाटील आणि मिनाबाई विलास पाटील (सर्व रा. वासरे ता.अमळनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment