---Advertisement---
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Amol Mitkari यांनी ‘VSR’ कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी सांगितले की, या अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळी यांच्या आईची त्यांनी रुग्णालयात भेट घेतली. यावेळी पिंकी माळी यांच्या आईने त्यांना एक ऑडिओ क्लिप ऐकवली असल्याचा दावा त्यांनी केला.
अमोल मिटकरी यांच्या मते, या ऑडिओमध्ये पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना या प्रकरणाबाबत पत्रकारांसमोर बोलू नये, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी VSR कंपनीचे मालक V. K. Singh यांच्यावरही संशय व्यक्त केला. “व्ही. के. सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असू शकतात. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी,” अशी आक्रमक मागणी अमोल मिटकरी यांनी केली.
दरम्यान, विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी यापूर्वीच सीआयडीसमोर आपला जबाब नोंदवला असून त्यांनी अपघाताचे कारण पायलट सुमित कपूर यांच्यावर टाकल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर Jay Pawar हे देखील लवकरच पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच अंडरवर्ल्डचा उल्लेख केल्याने या प्रकरणाला अधिकच खळबळजनक वळण मिळाले आहे.









