---Advertisement---
जळगाव : पिंप्राळा परिसरातीलसुख अमृत नगर येथे अर्ध नारेश्वर महादेव शिवलिंगाची व नंदी देवताची स्थापना सोमवारी (२१ जुलै ) रोजी दुपारी १२.३० वाजता ११ जोडप्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून करण्यात आली. त्या आधी रविवारी शोभायात्रा काढण्यात आली. ठीक ठिकाणी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन डीजेच्या तालावर फुगडी खेळून शोभा यात्रेचा आनंद लुटला.
ट्रॅक्टरवर महादेवाची शिवलिंग व नंदी देवताची पूजा करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. सर्व महिलांनी पिवळी रंगाची साडी परिधान केली होती. शोभा यात्रेस जोगेश्वरी माता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ठीक ठिकाणी महादेवाची पूजा करण्यात येत होती. यावेळी चिमुकल्यांनी डोक्यावर कलश घेऊन महादेवाचा गाण्यावर नृत्य करत होती. यावेळी उत्साहात शोभायात्रा काढण्यात येऊन हर हर महादेवाचा जयघोष करण्यात आला.
---Advertisement---
सोमवारी महादेवाची स्थापना
सोमवारी २१ रोजी सकाळी ९ वाजता चेतन कपोले महाराज व त्यांच्या सहकारी यांच्या हस्ते विधिवत पूजेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला गणपती पूजन त्यानंतर ११ जोडप्यांच्या हस्ते होम हवन, अर्ध नारेश्वर महादेव व नदी देवताची दुपारी १२.३० या शुभ मुहुर्तावर गंगेच्या पाण्याने जल अभिषेक त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करून स्थापना करण्यात आली.
या जोडप्यांच्या हस्ते हवन पूजा
राहुल सोनवणे – आरती सोनवणे, बाजीराव सोनवणे – सुरेखा सोनवणे, ललित बारी – आशा बारी, प्रशांत पाटील – विद्या पाटील, पवन पाटील – स्वाती पाटील,सुब्रोतो बिस्वास -स्मृती बिस्वास, सुधाकर पाटील – स्वाती पाटील, सुजित कापसे – मीनाक्षी कापसे, प्रवीण पाटील – सपना पाटील, राजेंद्र कापूरे – अनिता कापूरे , रोहन पराये – तेजश्री पराये यांच्या हस्ते हवन पूजन करण्यात आले.
यशस्वीतेसाठी डॉ. कमलाखी सरकार, श्यामलता सरकार, दीपक कापूरे, कल्याण पाटील, तुकाराम पाटील, अनिता कापूरे, राहुल सोनवणे, संतोष कुंभार, प्रशांत पाटील, भुऱ्या पाटील, सुब्रोतो बिस्वास, स्मृती बिस्वास, चित्रकार भाग्यश्री चव्हाण तसेच अर्ध नारेश्वर महादेव महिला मित्र मंडळ व परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.