खरात च्या SIT तपासून धक्कादायक खुलासे ; एका भेटीसाठी घ्यायचा तब्बल इतक्या लाखांची फी

---Advertisement---

 

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे त्यांच्या फसवणुकीचे नव्हे आणि धक्कादायक पैलू समोर येत आहेत विशेष तपास पथक (SIT) करत असलेल्या चौकशीत खरातने श्रद्धेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती उघड झाली आहे त्याच्या भेटीसाठी लाखो रुपयांची फी आकारली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.


तपास यंत्रणांच्या माहितीनुसार अशोक खरात केवळ काही तासांच्या भेटीसाठी मोठी रक्कम मागत असेल भक्तांच्या घरी किंवा फार्म हाऊस वर जाण्यासाठी तो विशेष सोयी सुविधांची अट घालत असे. आलिशान व्यवस्था लांबच्या प्रवासासाठी विमान प्रवासाची मागणी आणि महागड्या गाड्या हा त्याच्या अटींचा भाग असल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा उकडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या निवासस्थानाबाहेर श्रीमंत भक्तांची मोठी गर्दी होत असल्याची माहिती ही तपासात समोर आली आहे. या दिवशी तो विशेष पूजा आणि विधी करण्याच्या नावाखाली मोठ्या रकमांची मांगणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.


सोमवारी एसआयटी पथकाने खरातच्या कार्यालयाची झडती घेतली असता अनेक वस्तू जप्त करण्यात आले यात काही जडीबुटीसदृश वस्तू अन्नपदार्थ आणि विविध उपकरणांचा समावेश आहे. तसेच भक्तांची नावे आणि व्यवहारांची माहिती असलेली नोंदवही पोलिसांच्या हाती लागले आहे या नोंदीच्या आधारे आणखी काही महत्त्वाचे नावे आणि व्यवहार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय खरा तिच्या कार्यालयातील दरवाजे आणि काचा आवाज बाहेर जाऊ नयेत यासाठी विशेष पद्धतीने बसवण्यात आल्या होत्या का, याची फॉरेन्सिक तज्ञांकडून तपासणी सुरू आहे. तपासा दरम्यान घटनास्थळी नेण्यात आल्यानंतर पिढीतेला घडलेल्या प्रकारांची आठवण झाल्याने ती भाऊक झाल्याचे ही समजते.

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---