---Advertisement---
---Advertisement---
यंदाच्या आशिया चषक २०२५ स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. मात्र, स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार ही स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धंतील सर्वांचे आकर्षण ठरणारी भारत – पाकिस्तान लढत ही १४ सप्टेंबरला होणार आहे. हे दोन्ही संघ एकाच गटातून खेळतील.
आशिया चषक स्पर्धा यंदा टी २० फॉरमॅटमध्ये असणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२६ ही स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून तशी तयारी करण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडं या वर्ल्डकप स्पर्धेचं संयुक्त यजमानपद असणार आहे.
आशिया चषकाकरिता गृप ए व गृप बी असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. यात एका गटात प्रत्येकी चार संघ असणार आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भारत आणि पाकिस्तान संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. . ‘ग्रुप ए’मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान हे संघ असतील. तर ग्रूप बीमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे चार संघांचा समावेश आहे.
भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला
या स्पर्धेची सुरुवात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या दोन संघांमध्ये होणाऱ्या सामन्याने होईल. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध १४ सप्टेंबरला होईल. भारताची तिसरी लढत १९ सप्टेंबरला ओमानविरुद्ध असणार आहे.