Assembly Election 2024 : आ. भोळेंचे पिंप्राळा भागातील नागरिकांकडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

जळगाव : जळगाव शहर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी पिंप्राळा परिसरात प्रचार केला. या प्रचारादरम्यान, एका भगिनीने काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बारीवाडा परिसरातील भगिनीने रांगोळीद्वारे “अब की बार, राजू मामाच आमदार” अशा शुभेच्छा दिल्या आहेत. अशा प्रेमळ शुभेच्छांनी आ. भोळे हे भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले.

गुरुवारी आ. सुरेश भोळे यांनी पिंप्राळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून व पुष्पहार अर्पण प्रचाराला सुरुवात केली. यानंतर गर्जना चौक, बारीवाडा परिसर, कोळीवाडा परिसर, संत मीराबाई नगर, गणपती नगर, प्रल्हाद नगर, आनंद मंगल सोसायटी, इंद्रदेव नगर, निसर्ग कॉलनी परिसर, साई मंदिर परिसर, नामदेव नगर परिसरातून हुडको परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, ‘प्रति मकरंद अनासपुरे’ खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी प्रचारात सहभाग घेऊन मतदारांना आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन रॅलीमध्ये ज्युनियर मकरंद अनासपुरे असलेले खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी सहभागी होत जनतेकडे आ. राजूमामा भोळे यांच्यासाठी आशीर्वाद मागितले.



रॅली बारीवाडा परिसरामध्ये पोहचल्यावर माधुरी हितेश बारी या भगिनीने “अब की बार, राजू मामाच आमदार” या आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेतले. यावेळी अनेक महिला भगिनींनी आ. भोळे यांचे औक्षण करत त्यांना विजयासाठी सदिच्छा दिल्या. संत मीराबाई नगर येथे राधाकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर आणि महादेव मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी आ. भोळे यांनी साकडे घातले. तसेच माजी नगरसेवक शोभाताई बारी यांच्या घरी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले.

प्रचार रॅलीमध्ये भाजपाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, माजी नगरसेवक शोभा बारी, सुरेश सोनवणे, मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ति महाजन, शुभांगी बिऱ्हाडे, नीतू परदेशी, विजय पाटील, अतुल बारी, चंद्रकांत कोळी, डॉ. जयश्री बारी, माजी नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, कैलास सोनवणे, शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, कुंदन काळे, उमेश सूर्यवंशी, महेंद्र केळकर, किरण भोई, योगेश गोसावी, उमेश सोनवणे, आशुतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा नियोजन समिती सदस्य योगेश देसले, विनोद देशमुख, सुनिता शिंदे, योगेश पाटील, लता मोरे, पी.एस. पाटील, साजिद पठाण, रिपाई (आठवले) गटाचे पदाधिकारी मिलिंद अडकमोल, मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.