जळगाव : राज्यात विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु झाली आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. यात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पदाधिकारी व कार्यकर्ते जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी आ. सुरेश भोळे यांना पाठिंबा देत मनसेचे शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
जळगाव शहराच्या विकासाचे काम आमदार सुरेश भोळे हे उत्तमरीत्या करीत आहेत. त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी भाजपाकडूनच पक्षांतर्गंत मदत करण्याचा निर्धार आशिष सपकाळे यांनी केला. याला अनुसार कृती करत श्री. सपकाळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा महायुतीचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला. या प्रवेश सोहळ्याला महायुतीचे विधान सभा जळगाव शहर मतदार संघाचे उमेदवार आमदार सुरेश भोळे, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, दीपक सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निलेश पाटील आदी उपस्थित होते.
भाजपा पक्ष प्रवेशाचा निर्णय घेताना मनसे पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांबद्दल कोणताही राग रोष नसल्याचे श्री. सपकाळे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन, विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात राज्याच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने हा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना सध्याच्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत त्यांनी निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. आशिष सपकाळे यांनी समाज माध्यमातून त्यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात कोणताही दुष्प्रचार होऊ नये असे आवाहन केले आहे.
मनसेच्या या पदाधिकाऱ्याने केला पक्षप्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे , सहसचिव खुशाल ठाकूर, दीपक राठोड, निलेश परदेशी शहर संघटक वाहतूक सेना, पवन सपकाळे विभाग अध्यक्ष, आशुतोष जाधव, हरिओम सूर्यवंशी प्रसिद्धीप्रमुख, इस्माईल खाटीक जळगाव चिटणीस वाहतूक सेना, राजू डोंगरे, विशाल पवार, वासुदेव पाटील, दीपक तायडे विभाग अध्यक्ष, संतोष वाणी, नितीन सैनी, कमलेश डांबरे, संजय वरयानी. प्रणव चव्हाण मग अध्यक्ष निलेश वाणी विभाग अध्यक्ष दीपक राठोड विभागाध्यक्ष पवन सपकाळे विभाग अध्यक्ष साजन पाटील तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.