Assembly Election 2024 : आमदार सुरेश भोळे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार !

जळगाव : सोमवारी, २८ रोजी मी उमेदवारी अर्ज दखल करणार आहे. जनतेसमोर विकासकामांचे व्हिजन घेऊन जाणारी माझी उमेदवारी आहे. मागील १० वर्षाच्या कार्यकाळातील जनसेवेची समृद्ध परंपरा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेल, अशी ग्वाही जळगाव विधानसभा मतदार संघटातून निवडणूक लढवीत असलेले महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांनी दिली आहे.
माझी उमेदवारी विकासकामांचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जाणारी आहे. सोमवारी दि. २८ रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. गेल्या १० वर्षातील जनसेवेची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया जळगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांनी दिली आहे.

आमदार सुरेश भोळे हे मागील दहा वर्षापासून जळगाव शहर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्यातील सक्षम नेतृत्व तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची गंगा जळगाव शहरात आणली. हीच विकास कामांची व जनसेवेची समृद्ध परंपरा आता पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार भोळे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

आ. सुरेश भोळे सोमवार, २८ रोजी महायुतीतर्फ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना, आरपीआय या पक्षांचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत राहणार आहेत. आमदार भोळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्ह्यातील तिन्ही मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, महायुतीचे सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उमेदवारी अर्ज रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात येईल. या शक्ती प्रदर्शन रॅलीकरीता महायुतीतर्फे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. जनतेने आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने निवडून द्यावे असेही, आवाहन आ.भोळे यांनी केले आहे.