Assembly Election 2024 : राजुमामांनी प्रचारात घेतली आघाडी, अवघे शहर झाले भाजपमय

जळगाव : महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजुमामा भोळे यांनी इतर पक्षांच्या तुलनेत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विरोधकांना धडकी भरेल अशा प्रचार सभा राजुमामांच्या होत आहे. ५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या प्रचाराने आता अवघे शहर भाजपमय झाले आहे. लाडक्या बहिणींचे आशीर्वाद राजुमामांना मिळत आहेत.

५ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या प्रचारात मामांनी आपल्या लाडक्या जळगावकरांना भेटी देत असताना कोणताही संकोच न बाळगाता, कुठलीही जात-पात, धर्मांच्या भींतीना पाठ देत सर्वांचेच आशीर्वाद घेतले. सर्वांना आश्वास्त केले आहेँ. गेल्या पाच दिवसात मामांनी विविध प्रभागांमध्ये प्रचार रॅली काढून लोकांच्या भेटी घेतल्या. राम मंदिरात प्रचार नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली. यानंतर जुने जळगाव, शिव कॉलनी, आशाबाबा नगर, श्रीधर नगर, हरीविठ्ठल नगर, खंडेरावनगर, कांचन नगर, चौघुले प्लॉट, हरीओम नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक वाडी, गंधर्व कॉलनी, यशवंत कॉलनी, पिंप्राळा, समर्थ कॉलनी, ओंमकारेश्वर परिसर, महाबळ परिसर, इच्छादेवी परिसर, पंचशील नगर, गुलाबबाबा कॉलनी, जय जवान नगर, अक्सा चौक, अक्सा नगर, राम नगर, खेडी, विठोबा नगर, ज्ञानदेव नगर, दत्त नगर, तळेले कॉलनी, हॅप्पी होम कॉलनी, सोपानदेव नगर, रामचंद्र नगर, अशोक नगर, तुकराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, छत्रपती शिवाजी नगर परिसर, अमर चौक, दालफड, बौद्ध विहार परिसर, हुडको, धनाजी काळे नगर, इश्वर कॉलनी, सम्राट कॉलनी, नवल कॉलनी, सिंधी कॉलनी या भागात नागरीकांना भेटी देऊन आशीर्वाद घेतले आहेत. राजु मामांच्या प्रचार दौऱ्यांमुळे विरोधकांना घाम फुटला आहे. नागरीकांना उत्स्फुर्त प्रतिसाद राजु मामांना मिळत आहे.प्रचाराच्या अंतिम टप्प्यात होणार जळगाव शहरात आता कॉर्नर सभा व मोठ्या सभांवर भर मोठ्या नेत्यांच्या सभा लवकरच लागणार आहेत.