जळगाव : देवांग कोष्टी समाजाच्या हितचितकांच्या वतीने महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे पत्र अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज जिल्हाध्यक्ष तथा अध्यक्ष- देवांग कोष्टी समाज, जळगाव शहर चंद्रकांत लक्ष्मण पंधारे यांनी जी. एम. फाऊंडेशन कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांना दिले. देवांग कोष्टी समाजाच्या हितचितकांच्या वतीने आपल्याला व आपल्या पक्षाला आमचा जाहिर पाठींबा देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाठिंबा पत्राचा आशय असा की, ना. गिरीश महाजन आपण गेल्या अनेक वर्षापासून कोष्टी समाजाच्या केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध समस्या आणि अडचणी तत्परतेने सोडवण्यात आलेल्या आहेत. आपल्या कष्ट, सेवाभाव, आणि समाजहिताची भावना पाहून आपण समाजाचे खरे हितचिंतक आहात, असे आम्हाला वाटते. आपले प्रत्येक कार्य हे समाजाच्या प्रगतीच्या दिशेने पुढे नेणारे आहे. आपल्या या कार्यालतून समाजाच्या प्रत्येक घटकास प्रेरणा मिळाली असून, समाजातील प्रत्येकाने आपल्याला पाठींबा देणे हे अत्यंत आवश्यक आहे.
समाजाच्या हितचितकांच्या भुमिकेत आपण सदैव समाजाच्या पाठीशी उभे राहिलात. आणि सामाजाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहिलात, याबद्दल आम्ही आपले मनःपुर्वक धन्यवाद मानतो. आपल्या नेतृत्वात कोष्टी समाजाला नवीन दिशा मिळेल आणि प्रगतीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाईल याची आम्हाला खात्री आहे. आपण कोष्टी सामाजाच्या वतीने 100% पाठींबा तर मिळवताच आहात. परंतू समाजातील इतर घटकांनी देखील आपल्याला पाठींबा द्यावा अशी आम्ही विनंती करतो. आपले नेतृत्व समाजाला नक्कीच नवी दिशा देईल असा विश्वास आहे. आपल्या भावी वाटचालींसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. समाजहितासाठी आपण असेच सदैव कार्य करत रहावे अशी आमची इच्छा आहे. देवांग कोष्टी समाजाच्या हितचितकांच्या वतीने आपल्याला व आपल्या पक्षाला आमचा जाहिर पाठींबा देण्यात येत आहे.
या पाठिंबा पत्रावर देवांग कोष्टी समाज जळगाव उपाध्यक्ष अजय आळंदे, सचिव चंद्रकांत कहाणे, खजिनदार अर्चना आळंदे, सुनील पंधारे, विजय पंधारे, कैलाश पंधारे, अविनाश गुरसाळे, छाया आळंदे, दिनेश पारखे, सुहास उनवणे, शांताराम आळंदे, आंबादास काकडे, राजेंद्र हरिमकर , दिपक आळंदे आदींची स्वाक्षर आहे.