जळगाव,रामदास माळी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली असून राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांत पाच विद्यमान आमदारांसह तीन मंत्री निवडणुकीच्या आखाड्यात उत्तरले आहेत. जिल्ह्यात आजी माजी मंत्री व आमदारांनी निवडणुकीत चुरस वाढवली आहे. बंडखोर उमेदवारांची संख्या वाढल्याने सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यात ११ मतदारसंघांपैकी जळगाव शहर मतदारसंघातून महायुतीकडून आमदार सुरेश भोळे, चाळीसगावमधून आमदार मंगेश चव्हाण, पाचोऱ्यातून आमदार किशोर पाटील, भुसावळातून आमदार संजय सावकारे, तर मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार चंद्रकांत पाटील रणांगणात आहेत. त्याचप्रमाणे महायुतीकडून जामनेरातून मंत्री गिरीश महाजन, जळगाव ग्रामीणमधून मंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरातून मंत्री अनिल पाटील आखाड्यात उतरले आहेत. माजी आमदारांमध्ये भडगाव पाचोरा मतदारसंघातून दिलीप वाघ, तर चोपड्यातून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, पारोळ्यातून शिरीष चौधरी या निवडणुकीत नशिब आजमावित आहेत. माजी मंत्र्यांमध्ये महाविकास आघाडीकडून जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर निवडणूक लढवित आहेत. माजी खासदार ए. टी. पाटील पारोळ्यातून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. तसेच माजी खासदार उन्मेश पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून चाळीसगाव मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.
जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघात १३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात सर्वाधिक २९ उमेदवार जळगाव मतदारसंघात आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ४ नोव्हेंबर रोजी ९२ उमेदवारांनी माघारी घेतली होती.
बंडखोरीने साधला जाणार समतोल
जिल्ह्यात बंडखोरीचा विचार केल्यास महायुती व महाविकास आघाडी दोन्ही बाजूने दिसून येते. त्यामुळे या बंडखोरीचा एका पक्षाला फटका न बसता त्यातही समतोल साधले जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत बंडखोर उमेदवाराचा महायुती व महाविकास आघाडी दोन्हीकडील उमेदवारांना त्यांचा काही तोटा होईल, असे चित्र दिसून येत नाही.
आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील ‘उबाठा’चे कुलभूषण पाटीलही बंडखोरी करीत अपक्ष रणांगणात उतरले आहेत. त्यांचा जळगाव शहरात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मताधिक्क्यावर त्यांचा फारसा परिणाम होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून तरी जाणवत नाही. जळगाव शहर मतदारसंघाचे उदाहरण घेतल्यास भाजपातील आश्विन सोनवणे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील ‘उबाठा’चे कुलभूषण पाटीलही बंडखोरी करीत अपक्ष रणांगणात उतरले आहेत. त्यांचा जळगाव शहरात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मताधिक्क्यावर त्यांचा फारसा परिणाम होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून
तरी जाणवत नाही.
अत्यल्प मतदारसंघातच बंडखोरीचा प्रभाव
जिल्ह्यात काहीच मतदारसंघात बंडखोरीचा प्रभाव होऊ शकतो. जिल्ह्यात चोपडा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून एकाच रात्रीतून खेळी करीत भाजपाचे प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी देऊन त्यांचा एकाच रात्रीतून पक्ष प्रवेश करण्यात आला. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात जाहीर केलेल्या उमेदवाराचा एबी फॉर्म वापस घेण्यात येऊन प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. चोपडा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ऐनवेळी उमेदवार बदल करण्याची खेळी या मतदारसंघात करण्यात आली. जिल्ह्यात चाळीसगाव मतदारसंघात बंडखोरी शमविण्यात महायुती व महाविकास आघाडीला यश आले आहे. मात्र इतर १० मतदारसंघात बंडखोरांना थांबविण्यात राजकीय पक्ष यशस्वी होऊ शकलेले नाहीत.