---Advertisement---

Assembly Election : ‘विश्वास जुना राजूमामा पुन्हा’ रांगोळीने वेधले रॅलीचे लक्ष

by team
---Advertisement---

जळगाव । महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आ. भोळे यांचे भगवान नगर भागात पूर्ण गल्लीमध्ये सडा-समार्जन करून रांगोळ्या व फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभीत स्वागत करण्यात आले. तरुणांसह अबाल वृध्दांकडून मिळालेल्या प्रेमाने आमदार भोळे भारावून गेले.

भूषण कॉलनी येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे पूजा करून सोमवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तिथून कोल्हे नगर, मुंदडा नगर, अंबिका हौसिंग सोसायटी भगवान नगर, शास्त्रीनगर, रामानंदनगर, विवेकानंद नगर मार्गे वाघ नगर परिसरात प्रचार रॅलीचा समारोप झाला. मार्गात महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आशाताई कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, वसंतराव कोल्हे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठांचे आमदार भोळे यांनी आशीर्वाद घेतले.

माजी महापौर ललित कोल्हे यांच्या घरी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी यांनी काढलेली “विश्वास जुना, राजूमामा पुन्हा” या शीर्षकाखालील रांगोळी रॅली दरम्यानची आकर्षण ठरली. रॅलीच्या शेवटी वाघ नगर परिसरात माजी नगरसेविका उषाताई संतोष पाटील यांच्या घरी भाजप,शिवसेना व महायुती पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक गायत्री राणे, उषाताई पाटील, मंडळ क्रमांक ६ चे अध्यक्ष बापू कुमावत, अजित राणे, राजेंद्र खैरनार, संतोष पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment