Baba venga prediction: बाबा वेंगाच्या भाकिताने जगात खळबळ? त्या वेडेपणामुळे जगाचा विनाश होणार? बाबा वेंगाच्या भाकि‍ताचा अर्थ काय?

---Advertisement---

 

Baba venga prediction 2026: जगभरात भविष्यवाण्यांमुळे चर्चेत राहिलेल्या बाबा वेंगा यांच्या 2026 सालाविषयीच्या कथित भाकितांची सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः जागतिक तणाव वाढत असताना “मोठ्या युद्धा” विषयीचे दावे व्हायरल होत आहेत.

बाबा वेंगा यांचं नेमकं काय आहे 2026 चे भाकीत?

सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टनुसार, 2026 मध्ये मोठे आंतरराष्ट्रीय युद्ध भडकू शकते आणि त्याचा मानवजातीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. काही पोस्टमध्ये तर तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेखही केला जातो.

जागतिक राजकारणात वाढता तणाव हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. US आणि इराण यांच्यातील संबंध, तसेच रशिया, चायना आणि इस्राईल यांच्या भूमिकांबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. काही विश्लेषकांच्या मते, या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर जुनी भविष्यवाणी पुन्हा पुढे आणली जात आहे. काही पोस्टमध्ये माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या भूमिकांचाही उल्लेख केला जातो. काही व्हायरल संदेशांमध्ये मार्च-एप्रिल 2026 दरम्यान मोठे युद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, या दाव्यांना कोणताही अधिकृत किंवा वैज्ञानिक आधार नाही.

शास्त्रज्ञांचे मत काय?

तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचे मत वेगळे आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या प्रामुख्याने मौखिक स्वरूपात असल्याचे सांगितले जाते. त्या स्पष्ट देश, कालावधी किंवा ठोस घटनांवर आधारित नसतात. त्यामुळे त्या वैज्ञानिकदृष्ट्या पडताळता येत नाहीत. अनेक संशोधकांच्या मते, जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोक स्वतःच अशा भाकितांचा अर्थ लावतात. त्यामुळे काही घटना घडल्यास त्या भविष्यवाणीशी जोडल्या जातात.

2026 विषयीचे दावे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असले तरी त्यांना कोणताही अधिकृत किंवा वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही. जागतिक राजकारणातील तणाव आणि अनिश्चितता यामुळे अशा भविष्यवाण्यांना अधिक प्रसिद्धी मिळते. वाचकांनी अशा दाव्यांकडे समतोल दृष्टीकोनातून पाहावे आणि अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे तज्ज्ञांचे आवाहन आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---