१५व्या वित्त आयोगातून १००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक

---Advertisement---

 

जळगाव (दि. १५ मार्च २०२६): बालकांना अंगणवाडीत अधिक आरामदायी आणि आकर्षक वातावरण मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील सुमारे १००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बसण्याचे बाक (Banana Shaped Benches) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या उपक्रमामुळे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना खेळत-खेळत बसण्याची आणि शिकण्याची सोय होणार आहे. केळीच्या आकाराचे रंगीत बाक मुलांना आकर्षित करणारे असून त्यामुळे अंगणवाडीतील शैक्षणिक वातावरण अधिक आनंददायी होण्यास मदत होईल. तसेच मुलांच्या बसण्याची सुरक्षित आणि व्यवस्थित व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे अंगणवाड्यांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे जिल्हाभरातून स्वागत होत असून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी पुढेही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---