विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स तांत्रिक पातळीवर तपासासाठी सक्रिय, अपघाताच्या घडामोडींचं चित्र स्पष्ट होणार ?

---Advertisement---

 

दिवंगत अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले आणि या दुर्गटणेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ब्लॅक बॉक्स हा आता तांत्रिक पातळीवर तपासासाठी सक्रिय करण्यात आला आहे अपघातादरम्यान घडलेल्या सर्व घडामोडी व अपघाताचे नेमके कारण आता समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांकडून अत्यंत दक्षतेने आणि प्रोटोकॉल नुसार ब्लॅक बॉक्सची पुढील प्रक्रिया राबवली जात आहे.

बारामतीत झालेल्या विमान अपघाताच्या घटनास्थळी अपघात ग्रस्त विमानाच्या अवशेषांमध्ये विमानाचा ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित रित्या सापडल्याने अपघाताच्या तपासाला मोठी दिशा मिळाली आहे मात्र त्यातील डेटा उघडणं हे अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक पातळीवर महत्त्वाची प्रक्रिया असल्याने ती विशेषतज्ञांच्या देखरेखीखाली सुरू झाली आहे. विमानाच्या उड्डाणाधर्मांची सर्व तांत्रिक माहिती इंजिनची स्थिती पायलट आणि कंट्रोल रूम मधील संवाद शेवटच्या क्षणातील सर्व काही नोंदी ह्या ब्लॅक बॉक्समध्ये साठवलेल्या असतात त्यामुळे या सर्व डेटा चे विश्लेषण अपघाताच्या मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचा ठरतं.

दरम्यान या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे महाराष्ट्र सरकारने सोपवला असून केंद्राच्या आय बी विभागाने ब्लॅक बॉक्स हा जप्त केला आहे आणि त्याच्या माहितीवरून आता अपघाताचे कारण स्पष्ट होईल त्यानंतर जर कंपनी दोशी ठरल्यास विमान कंपनी मालकावर कठोर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाच्या ब्लॅक बॉक्स मधील माहिती तपास अधिकाऱ्यांच्या मते व्यवस्थितरित्या मिळवण्यासाठी विशेष प्रयोग शाळेमध्ये उच्च तांत्रिक साधनांचा वापर करून तपासली जाते त्यानंतर डेटा खराब झालेला नसल्याचे प्राथमिक खात्री झाल्यानंतरच ब्लॅक बॉक्स चा डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते दरम्यान या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर काळजी घेतली जाते. या ब्लॅक बॉक्स मधील कोणतीही माहिती नष्ट होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेऊन संबंधित तज्ञांची टीम या कामात सक्रिय असते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---