एकाच गावात आढळल्या हजारो बोगस जन्मनोंदी ? भाटपुरी प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन….

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात अस्तित्व नसलेल्या भाटपुरी या गावात भाटपुरी या गावाच्या नावाने तब्बल 4 हजार 907 इतक्या खोट्या जन्म नोंदी आढळल्याच धक्कादायक प्रकरण हे समोर आलं आहे, या संदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जळगाव जिल्हा दौरा करत भाटपुरी या गावी येऊन भेट दिली व या संपूर्ण प्रकाराची सखोल माहिती घेणार असल्याचे सांगितल.

भाटपुरी या गावातील बोगस जन्म नोंदणी प्रकरणी तपासात काय निष्पन्न झालं, पाहुयात.. ⬇️

बिहार राज्यातल्या आदर्शकुमार उर्फ विकी अशोक दुबे नामक तरुणाने जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात भाटपुरी नावाने तेरा बोगस आयडी ह्या निर्माण केल्या आणि 2010 ते 2025 अशा तब्बल 15 वर्षाच्या कालावधीत या आयडीचा वापर करून एकूण 4 हजार 907 खोट्या अर्थात बोगस जन्म नोंदणी केल्या, असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील ही काही गावांमध्ये आदर्श कुमार उर्फ विकी अशोक दुबे या तरुणांनी केला होता व याबाबत यवतमाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या तरुणाला पोलिसांनी अटक केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही असा प्रकार झाल्याची तपासात निष्पन्न झाले. तद्नंतर पारोळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांनी फिर्याद देत, पारोळा पोलिसांकडून या प्रकरणाचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भाटपुरी या गावाचा दौरा केल्यानंतर या प्रकरणाच्या गंभीरतेवर भर देत या प्रकरणाबाबत प्रशासनाला त्वरित योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आणि त्यानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले, आता एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराची सखोल तपासणी केली जाणार आहे. दरम्यान रताळे गावातील या भेटीदरम्यान किरीट सोमय्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाच्या गतीबाबत देखील माहिती घेतली व या संपूर्ण प्रकाराबाबत मात्र प्रशासकीय गटात मोठी खळबळ उडाली असून पारोळा तालुक्यासह भाटपुरी तसेच रताळे गावात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. येत्या काळात एसआयटीच्या चौकशीत नेमकं काय उघडकीस येईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---