---Advertisement---

‌‘व्हाईस ऑफ मीडिया‌’च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भावना शर्मा यांची निवड; मीडिया क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाला मान्यता

---Advertisement---

जळगाव : मीडिया, मार्केटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात 25 वर्षांचा अनुभव असलेल्या भावना शर्मा यांची ‌‘व्हाईस ऑफ मीडिया‌’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सध्या त्या ‌‘तरुण भारत‌’च्या जळगाव विभागात शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत.

भावना शर्मा यांनी लोकमत मीडिया प्रा. लि.मध्ये दीर्घकाळ कार्य करताना ब्रँडिंग, इनोव्हेटिव्ह मार्केटिंग मोहिमा व जाहिरात धोरणे यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी विविध क्षेत्रांतील अग्रगण्य कंपन्यांसोबत यशस्वी मीडिया मोहिमा राबविल्या असून, इव्हेंट कंसेप्ट डिझाइन, स्पॉन्सरशिप डेव्हलपमेंट आणि ब्रँड पोझिशनिंगमध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे.

सध्या त्या ‌‘आरिका डिजिटल मीडिया‌’च्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असून, शैक्षणिक संस्था, हेल्थ वेलनेस इंडस्ट्री आणि कॉर्पोरेट ब्रँडसाठी स्ट्रॅटेजिक डिजिटल सोल्यूशन्स पुरवत आहेत. त्यांनी नुकतीच ‌‘रिफ्रेम एज्युकेशनल‌’ हा उपक्रम सुरू करून डिजिटल शिक्षण व मीडिया अवेअरनेस क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.

या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना भावना शर्मा म्हणाल्या, ‌‘व्हाईस ऑफ मीडिया‌’च्या माध्यमातून पत्रकार बांधवांना एकवटणे, त्यांच्या समस्यांबाबत ठोस भूमिका घेणे, तसेच नव्या मीडिया पिढीला मार्गदर्शन करणे हे माझे उद्दिष्ट राहील.”

‌‘व्हाईस ऑफ मीडिया‌’ ही पत्रकार व मीडिया क्षेत्रासाठी कार्य करणारी अग्रगण्य संघटना असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तिच्या शाखा कार्यरत आहेत. भावना शर्मा यांची निवड ही जळगाव जिल्ह्यातील महिला नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. या निवडीबद्दल ‌‘व्हाईस ऑफ मीडिया‌’ सरचिटणीस दिव्या भोसले, महिला विंग प्रदेश अध्यक्ष रश्मी मारवाडी, सविता चंद्रे, राज्य कार्यकारिणी जनसंपर्कप्रमुख उज्वला बागुल यांसह महिला विंग पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---