---Advertisement---
शहरातील नवी पेठ परिसरातील रहिवासी भूषण संजय जोशी यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपमहानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियुक्तीनंतर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा गटनेते अर्शिन बानो, शोएब खाटीक यांनी भूषण जोशी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, शाकीर खान, प्रशांत सुरळकर, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, विजय कोळी, विभाग प्रमुख शोएब खाटीक, किरण भावसार, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, निता सांगोळे, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, सौरभ चौधरी, निलेश ठाकरे, बाळासाहेब कंखरे, शरद पाटील, राजेंद्र तायडे, किरण तायडे, पप्पू तायडे, गोरख केदारे, कलीम खान, शरीफ रंगरेज, निखिल महाजन, केतन जैन, कुणाल राजपूत, वैभव राजपूत, प्रफुल्ल नाईक, मयूर काटे, भूषण राजपूत, स्वप्निल कोळी, अनिकेत पाटील, राहुल अग्रवाल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









