रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! रेशनच्या धान्य वाटपात मोठा बदल; पुढील ३ महिने धान्य मिळणार नाही? मग धान्य कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर….!

---Advertisement---

 

देशातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मोफत धान्य वितरण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तांदूळ आणि गव्हाच्या वाटपाबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२६ पर्यंत वितरित होणारे तीन महिन्यांचे तांदूळ आणि गहू केंद्रीय साठ्यातून आगाऊ उचलून लाभार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्यांच्या अन्न सचिवांना केंद्र सरकारकडून पत्र पाठवण्यात आले असून नियोजित वाटपातील धान्य तातडीने उचलण्यास सांगण्यात आले आहे.

लवकरच देशभरात गहू खरेदी हंगाम सुरू होणार असल्यामुळे सरकारी गोदामांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. साठवणूक क्षमता आणि वाहतूक व्यवस्थेवरील दबाव लक्षात घेऊन राज्यांनी धान्य उचलण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे नव्याने खरेदी होणाऱ्या धान्यासाठी गोदामांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध होईल.

या प्रक्रियेसाठी सरकारने भारतीय अन्न महामंडळालाही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारांशी समन्वय साधून आवश्यक धान्यसाठा उपलब्ध राहील याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नवीन धान्य खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक तयारी करण्यासही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हा निर्णय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या एफसीआयकडे सुमारे ३७.२ दशलक्ष टन तांदूळ आणि २३.५ दशलक्ष टन गहू उपलब्ध आहे. हा साठा सामान्य पातळीपेक्षा सुमारे १८५ टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाचा फायदा देशातील ८० कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. तसेच राज्यांमधील रेशन वितरण प्रक्रिया अधिक नियमित आणि सुरळीत ठेवण्यास मदत होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---