---Advertisement---
गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात विक्रमी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी दराचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी उच्चांक गाठलेला दराला आता ब्रेक लागला असून सोन्याच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची तर चांदीच्या दरात १ लाख रुपयांची मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
उद्या ०१ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहेत आणि त्यापूर्वी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे काही दिवसांपूर्वी सोने हे पावणेदोन लाखांच्या टप्प्यावर होते तर चांदी ही चार लाखांच्या उंबरठ्यावर होती, सोने व चांदी या दोन्ही धातूंनी दराची एक ऐतिहासिक पातळी गाठली होती मात्र हीच तेजी आता तितक्याच वेगाने कमी होताना दिसत असून सोने व चांदीच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे.
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव हे १ लाख ८० हजार रुपये होते चांदीचे भाव हे ४ लाख रुपयांवर पोहोचले होते तर आज सोन्याचे भाव हे १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत आणि त्याच प्रमाणे चांदी २ लाख ९० हजार रुपयांवर घसरली आहे. आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होणार की घट ? याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागून आहे.









