जळगाव : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या शहिद दिनानिमित्त भाजपातफें अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (९ जून) रोजी करण्यात आले. विर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जळगाव महानगर जिल्हा व अनुसूचित जमाती मोर्चातफें प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले. भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी व भाजपा अनुसूचित जमाती महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले.
बिरसा मुंडा यांच्या प्रतिमापूजन भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन येथे सोमवारी (९ जून) करण्यात आले. कार्यक्रमात दिपक सुर्यवंशी यानी भगवान बिरसा मुंडा यांनी 25 वर्षाच्या आपल्या आयुष्यात भारतमातेसाठी केलेले कार्य व देशसेवा तसेच आदिवासी समाजाचे बळजबरीने होणारे धर्मांतर जल -जंगल- जमीनवरील अधिकार, अशा उज्वल अश्या संस्कृतीच्या रक्षणासाठी कसा लढा दिला याविषयी त्यांच्या कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी कॅबिनेट मंत्री ना गिरीश महाजन खा. स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शन लाभले. जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, उपाध्यक्ष राहुल वाघ, राहूल संकत, प्रमोद वाणी, दिलीप लाडवंजारी, रूपेश मोरया, चित्रा मालपाणी, नयना दुसाने, सुमन मराठे, माजी सैनिक सी. डी. पाटील, ईश्वर मोरे, रवींद्र पाटील, प्रकाश पंडित, कुमार सिरामे, अरूण इंगळे, भूषण वाणी, मयूर बारी, शुभम विंचवेकर यांच्यासह भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, मंडळ पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
