---Advertisement---
विकास चव्हाण जळगाव :
जळगाव महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची की महायुती करून? याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. असे असले तरी भारतीय जनता पार्टीन महापालिकेव्या सर्व ७५ जागा लढविण्याची तयारी केली असत्याची माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ‘व्हीजन भाजपाचे’ या कार्यक्रमांतर्गत संवाद साधतांना दिली.
शहराच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वसामान्य जनतेसह विविध राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. अशात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावात देखील या निवडणुकीच्या निमित्ताने मोर्चे बांधणीता सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची काय भूमिका असणार आहे? या विषयावर ‘तरुण भारत’ तर्फे भाजपा जळगाव शहर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. भाजपातील प्रवसाविषयी दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले की, मी आज भारतीय जनता पक्षाचा महानगर जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी मी एक कार्यकर्ता म्हणून १९८९ साली लोकसभेची निवडणूक लागली होती. त्यावेळी डॉ. गुणवंतराव सरोदे हे उम दवार होते. त्यावेळी कार्यकर्ता म्हणून सक्रीय झालो. त्यानंतर मला युवा मोर्चाची जबाबदारी मिळाली. नंतर मंडलाची जबाबदारी मि – ळाली. मग जिल्ह्याची जबाबदारी मिळाली. नंतर कार्यालय मंत्री म्हणून मी पाच वर्षे काम – केलं. केलं. यासह केंद्रात ग्रामीण विकास मंत्री एम. के. पाटील होते तेव्हा संधाने मता त्यांचे स्वीय्य सहाय्यक म्हणून जबाबदारी दिली. मतदार संघातील कामे व्हावीत ही त्यामागची भूमिका होती. पुढे जिल्हा सरचिटणीस झालो, अशी वाटचाल करत सध्या जळगाव शहर जिल्हाध्यन म्हणून काम करत असल्याचे ते म्हणाले.
स्थानिक निवडणुकांबाबतची भूमिका
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सूर्यवंशी यांनी सांगितले की, फक्त निवडणुका आल्या म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही व सतत काम करत असतो. आमच्या पार्टीचे ३६५ दिवस काही ना काही कार्यक्रम सुरुच असतात. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आमची बुध रचना कार्यरत राहणार आहे. शहरात आमचे ३६१ बुध आहेत. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या ५७ जागा निवडून आल्या होत्या. वरिष्ठ पातळीनुसार, ही निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत. तरीही आमचे वरिष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे, खा. स्मिता वाघ आणि इतर पदाधिकारी एकच बसून निर्णय घेतील तेव्हा एकूण किती जागा तढवायच्या हे निश्चित होईल. आमची तयारी तर पूर्ण ७५ जागा लढण्याची आहे. त्या दृष्टीने आमची बुध रचना सुरु आहे. पण भविष्यात आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य राहील असेही त्यांनी सांगितले.
विकास हाच आमचा अजेंडा
आगामी मनपा निवडणुकीत ‘भारतीय जनता पार्टीचा विकास’ हाच अजेंडा राहणार असल्याचे दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले. केंद्रात आणि राज्यात जेव्हा भाजपाची सत्ता आली तेव्हा अपूर्ण असतेता शिवाजी नगर पूत, दूध फेडरेशनजवळचा पूल पूर्ण झाले. शहरात रस्ते-गटारींची कामे सुरु आहे. मेहरूण तलावाचा कायापालट झाला, पथदिव्यांचे काम होत आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवीन वस्त्यांमध्ये विकासकामे सुरु आहे. बायपासचा विषयदेखील मार्गी लागत आहे. साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हा प्रश्न सुटून वाहतुकीची कोंडी दूर होईल. अशी कितीतरी कामे होत आहेत. कारण केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने या विकास कामांना निधी मिळाला. शहरातील विकासासाठी ना. महाजन, आ. भोळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपूरावा करतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शहराला निधी मिळत विकास होत असत्याचा दावा त्यांनी केला.
रोजगार निर्मितीसह शहर स्मार्ट करणार
आगामी निवडणूक काळात रोजगार निर्मितीकडे भाजपाचं विशेष लक्ष आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न देखील सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे एमआयडीसीचा प्रस्ताव केंद्रात आणि राज्यात सत्ता असत्याने या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल. यातून अनेकांना रोजगार मिळेल. हे करत असताना शहर स्वच्छतेला देखील विशेष महत्त्व दिले दिले जाईल. कारण, स्वच्छता हे महापालिकेचं काम आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता अभियान राबविले. त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला होता. त्यामुळे भाजप १०० टक्के स्वच्छता अभियान राबवणार यासह शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगराच शंभर टक्के रस्ते, गटारी, पथदीवे, स्वच्छ पाणी नागरिकांना पुरविण्याचा आमचा मानस आहे. यासह ना. गिरिश महाजन, खा. स्मिता वाघ, आ. भोळे यांच्या प्रयत्नाने जळगावला समृद्धी मार्गाता कसं जोडता येईल हा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ना. गिरिश महाजन, खा. स्मिता वाघ, आ. भोळे यांनी दिल्लीला जात केंद्राकडे प्रस्ताव मांडला आहे. आगामी काळात ना. गिरिश महाजन, खा. स्मिता वाघ, आ. भोळे यांच्या प्रयत्नाने जळगाव शहर विकासाच्या बाबतीत एक नंबरवर कसं नेता येईल हे आमचं ध्येय असल्याचे दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले.
मनसे-उबाठाचा प्रभाव जिल्ह्यात नाही
मनसे आणि उबाठा शिवसेना यांच्या युतीसंदर्भात जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी म्हणाले की, शिवसेना (उबाठा) आणि मनसेची युती जरी झाली तर याचा जळगावात कुठलाच परिणाम होणार नाही. कारण जळगाव मनपाच्या निवडणुकीवेळी मनसे आणि शिवसेना एकत्र होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवून ५७ जागा निवडून आणल्या. ‘न भुतो न भविष्यती’ भाजपाने जळगाव मनपात ऐवढ्या जागा निवडून आणत्या. त्यामुळे उद्या कोणाचीही युती झाली तरी भारतीय जनता पक्षाला फरक पडणार नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता तळगळापर्यंत काम करत असत्याचे त्यांनी सांगितले.