घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

---Advertisement---

 

जळगाव : सध्या पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

या पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच Bharat Petroleum Corporation Limited, Hindustan Petroleum Corporation Limited आणि Indian Oil Corporation Limited या तेल कंपन्यांचे सेल्स अधिकारी, निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी करून गॅसचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास तत्काळ कारवाई करणार आहे.

नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रारी असल्यास 0257-2223180 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---