---Advertisement---
जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ वर गुरुवारी (१३ जून) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला. तत्काळ औषधोपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सदर व्यक्तीचा मृत्यू दीर्घ आजारामुळे नैसर्गिकरित्या झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
अनोळखी मृत व्यक्तीचे वय सुमारे ६० वर्ष असून, अंगावर निळसर रंगाचा मळकट शर्ट, हिरव्या रंगाची लुंगी होती. केस पांढरे वाढलेले, दाढी बारीक वाढलेली, रंग सावळा आणि शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या अनोळखी व्यक्तीच्या ओळखीकरिता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे राखून ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यास मदत करावी, असे आवाहन रेल्वे पोलीस जळगाव चौकीमार्फत करण्यात आले आहे.
---Advertisement---
सदर प्रकरणाचा तपास पो.हे.का. रविंद्र सुदाम पाटील (HC/494), रेल्वे पोलीस चौकी जळगाव हे करीत आहेत. ओळख पटवण्यासाठी कोणीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.