चिमुकला पतंग उडवायला गेला अन् दुसऱ्या मजल्यावरुन पडून झाला जखमी

जळगाव :  शहरात मकर संक्रांत मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत असताना रामेश्वर कॉलनी परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. रामेश्वर कॉलनी भागातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ राहणाऱ्या एका ७ वर्षीय चिमुकला पतंग उडवताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण…

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ श्लोक कैलास गिरगुणे हा ७ वर्षीय बालक आपल्या परिवारासह  वास्तव्याला आहे. दरम्यान, आज मकर संक्रांत असल्याने तो त्याच्या जुळव्या भावासोबत पतंग उडवत होता. तो सकाळी ११.३०  वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पतंग उडवत होता. यावेळी त्याच्या तोल गेल्याने तो दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला.  त्याला जळगाव शहरातील सारा हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मांजामुळे जखमी ५ जणांनी उपचार घेतले आहे. यात परशुराम विनोद गुंजे (वय ८, मटण मार्केट, जळगाव), मंगलाबाई महाजन (वय ५५, मेहरूण, जळगाव), फिरोज खाटिक (वय २५, रा. वावडदा ता. जळगाव) असे जखमी आले आहे. याशिवाय आणखी दोघे किरकोळ जखमी झाले आहे.