---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : आजही कंजरभाट समाजातील शिकलेल्या मुला मुलींना नोकरी नाही, उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार फिरताना युवक दिसत आहे. शिक्षणात आपली मुले मुली भटकू नये, आजारी असलेल्यांची अवस्था वाईट होऊ नये, सगळ्या लोकांना मदत व्हावी तसेच राज्यभरातील तामचिकर संघातील लोकांना सशक्त व समृद्ध करून महिलाना सशक्तिकरण करून तळागाळातील उपेक्षित घटक याना मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट यांनी प्रबोधन बैठकीत प्रतिपादन केले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र विघ्नहर ओझर येथे विमुक्त कंजारभाट समाजातील तमायचे परिवार युवा फाउंडेशनची सामाजिक सशक्तीकरण व प्रबोधन बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट, नंदुरबारचे राकेश तमायचे, अंबरनाथचे विनोद तामचीकर, जळगावचे नरेश बागडे, शशिकांत बागडे, जुन्नर तालुक्याचे सरपंच कुलदीप तामचिकर, धीरज तामचीकर, कांतिलाल तमायचे, मनोजबाबा माछरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नरेश बागडे, संजय मोती, , विजय बागडे,शशिकांत बागडे, राकेश तमायचे,गणेश बागडे ,रवी तमायचे, करण तमायचे यांच्यासह जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, , नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, ठाणे,पुणे कोल्हापूर, येथील सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद तामचीकर यांनी प्रास्तविक केले. फाउंडेशन स्थापनेचा उद्देश्य राज्यभरातील तामचिकर परिवार यांना सशक्त व समृद्ध करणे तसेच महिला सशक्तिकरण,शिक्षण,रोजगार, सामुहिक विवाह सोहळा करणे होय.
तामचिकर युवा फाउंडेशनची कार्यकारिणी
प्रदेश अध्यक्ष जयराज भाट (कोल्हापूर ), ,उपाध्यक्ष युवराज तामचिकर (नारायणगाव), महासचिव विनोद तामचेकर (अंबरनाथ ठाणे,) खजिनदार विशाल तामचिकर (विघ्नहर ओझर,) कार्याध्यक्ष राकेश तामचिकर (नंदुरबार), सहसचिव शशिकांत बागडे (जळगाव), मुख्य सल्लागार कुलदीप तमायचे,
कार्यालय सचिव विक्की तामचिकर (पिंपरी पुणे), कार्यकारणी सदस्य विजय बागडे (जळगाव) अजय उर्फ टोनी बागडे, रवी तमायचे(पुणे), मनोज तमायचे करण तामचीकर (दोंडाईचा) विशाल तामचीकर, या सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विशाल तामचीकर यांनी सूत्रंचालन केले तर युवराज तामचीकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी कुलदीप तामचिकर, युवराज तामचिकर ,विशाल तामचिकर ,बबलू तामचिकर ,लाखन तामचिकर,नितीन तामचिकर ,गोविंदा तामचिकर ,अतीष तामचिकर , सचिन तामचिकर, बेराज तामचिकर यांनी परिश्रम घेतले.