---Advertisement---

Crime News: जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट! भावानेच केला भावावर गोळीबार

by team
---Advertisement---

कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात एका चुलत भावाने दुसऱ्या भावाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशमधील जमिनीच्या मालकीवरून रणजित दुबे आणि त्याचा चुलत भाऊ राम दुबे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते, मात्र यावेळी हा वाद थेट रक्तपातात बदलला.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

१९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री राम दुबेने रणजित दुबे याला नाना पावशे चौकात अडवले. आधी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर राम दुबेने थेट बंदूक काढून रणजितवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात रणजित दुबे जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी राम दुबे फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

या घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासानुसार, जमिनीच्या मालकीच्या वादातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी राम दुबे याच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. तो सध्या फरार आहे

या घटनेनंतर संपूर्ण नाना पावशे चौक आणि कल्याण पूर्व भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment