---Advertisement---
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवघ्या १२ तासांत दोन बाईक शॉप फोडणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील एका बाईक शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे २,५०,००० रुपयांची रोकड चोरली होती. तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एका बाईक शॉपमधून १, २५ ,००० रुपयांची रोकड चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अवघ्या २२ तासांत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामनिवस मंजू गुप्ता (वय ३७ वर्षे, रा. राम नगर, कल्याण, जि. ठाणे) असे असून त्याच्यावर मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नालासोपारा आदी ठिकाणी घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीकडून चोरीची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली असून एकूण ३,० ४,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.









