State Cabinet Meeting Big Decision: राज्यातील कोळी बंधवांसाठी महत्त्वची बातमी आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपुर्वी सरकारने महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका लावला आहे. अशात राज्य मंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने तब्बल 41 निर्णयांना मंजुरी दिली आहे. यात कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊया काय आहे तो निर्णय.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वांचे निर्णय घेण्यात आले. यात कोळी बांधवांच्या दृष्टीने आतिषय महत्त्वाचा असा एक निर्णय देखील घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्य सरकार कोळी समाजासाठी लवकरच आणखी एका महामंडळ स्थापन करण्यात येणार असून या महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे.मच्छिमार आर्थिक विकास महामंडळ या नावाने हे महामंडळ स्थापन होणार आहे. या निर्णयाचा लाभ गोड्या पाण्यातील तसेच सागरी मच्छिमारांना होणार आहे.
कोळी बांधवांकडून निर्णयाचे स्वागत
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय कोळी समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या महामंडळाच्या स्थापनेमुळे कोळी बांधबांच्या प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे कोळी बांधवाकडून ढोलताशा वाजवून स्वागत करण्यात आले. यावेळी मुंबईतील कोळी बांधवांनी पारंपरिक ढोलताशा वाजवून आनंद साजरा केला.
या योजनेला मुदतवाढ
दरम्यान, या बैठकीत राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या राज्यात लडकील बहीण योजना खूप चर्चेत आहे. आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.