“मॅडमची बदली रद्द करा…” विद्यार्थ्यांची आर्त हाक; पालकांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे घेतली धाव..!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातल्या पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्वला सावकारे यांची बदली होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी धाव घेतली आहे. शिक्षिका उज्वला सावकारे यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली असल्याने त्यांची बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जळगावच्या पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेत उज्वला सावकारे मॅडम यांच्या अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली असून, शिक्षणाबद्दलचा उत्साहही लक्षणीयरीत्या वाढल्याचे पालकांनी यावेळी सांगितले. त्यामुळेच त्यांच्या बदलीचा निर्णय रद्द करावा, अशी एकमुखी भूमिका पालकांनी मांडली.

विशेष म्हणजे, लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली भावना व्यक्त करत “मॅडम जाऊ नयेत” अशी आर्त विनंती केली. या भावनिक प्रसंगाने उपस्थितांना हेलावून टाकले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांची बाजू ऐकून घेतली. तसेच या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, या घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांचे स्थान आणि विद्यार्थ्यांशी असलेले नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---