भरदिवसा गाडीचा काच फोडून चोरी; 45 हजाराची रोकड लंपास; पाचोरा शहरात खळबळ

---Advertisement---

 

पाचोरा येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर भरदिवसा छत्रपती शिवाजी महाराज चौकात वर्दळ च्या ठिकाणी गाडीचा काच फोडून अज्ञात चोरट्यांनी 40 ते 45 हजाराच्या रोकडसह चेकबुक व महत्वाचे कागदपत्रे लांबवल्याची घटना समोर आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील रहिवासी सुनील रामदास पाटील यांच्या मालकीचा गोंदेगाव येथे मॉल असल्याने ते त्यांच्या पत्नीसह पाचोरा येथे सामानाच्या खरेदीसाठी आले होते. सामानाची खरेदी झाल्यानंतर त्यांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाडी क्र. (MH-19/CZ-3114) लॉक करून जवळच असलेल्या सेलमध्ये गेले असता परत गाडीजवळ आले असता गाडीचा काच फोडून 40 ते 45 हजार रुपयांच्या रोकडसह कागदपत्रे चोरी झाल्याचे दिसून आले. सदर घटना भरदिवसा पाचोरा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडली आहे.या ठिकाणी सतत वर्दळ असते त्यात शनिवारचा बाजार अज्ञात चोरट्यांनी एवढी वर्दळ असतांना भरदिवसा गाडीचा काच फोडून रोकड लांबविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नुकतीच पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी भागात भरदिवसा सकाळीच 7:30 वाजेच्या सुमारास झुलेलाल मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी तीन चांदीचे मुकुट चोरून नेल्याची घटना घडली आहे सदर घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चोरटे अद्याप पोलिसांना मिळून आलेले नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---