जळगाव महापालिका निवडणूक प्रचाराला उधाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या शहरात भव्य रोड शो

---Advertisement---

 

Jalgaon News : जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार, ६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव शहरात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांसाठी मतदारांना साद घालणार आहेत.

दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून रोड शोला सुरुवात होणार असून, नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच समारोप होणार आहे.

या भव्य रोड शोमध्ये महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हा रोड शो केवळ निवडणूक प्रचारापुरता मर्यादित नसून, जळगावच्या विकासाविषयीचा विश्वास आणि भविष्यातील प्रगतीचा निर्धार व्यक्त करणारा असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. व्यापारी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत विशेष उत्सुकता असून, मार्गावर विविध ठिकाणी स्वागताची तयारी सुरू आहे.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---