गडचिरोली: माओवाद्यांच्या प्रभावाखालील जिल्हा अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्ह्यात आता परिवर्तन होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर गडचिरोलीत एसटी बस सेवा सुरू होणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दिवसाला खास महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. ते गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गडचिरोलीतील बदलांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी करताना सांगितले की, 25 वर्षांपासून मायनिंग सुरु होतं, मी मुख्यमंत्री असताना मला यांनी मदत मागितली. मी मदत केली पण त्याला आवश्यक पाठबळ मिळत नव्हतं. तेव्हा ते मुख्यमंत्री असताना त्यांनी स्थानिकांच्या विरोधानंतर, कच्च्या मालावर प्रक्रिया विदर्भात करावी अशी अट ठेवली आणि त्यानंतर पोलिसांच्या मदतीने या क्षेत्रात परिवर्तन घडवले. कोनसरी येथील भूमिपूजनाच्या वेळी लोकांनी शंका व्यक्त केली होती, पण आज त्याच प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे 9 हजार लोकांना रोजगार मिळत आहे, 25 हजार कोटींची गुंतवणूक येत आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोलीतील जल, जमीन, जंगल आणि बायो डायव्हर्सिटीला नुकसान होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. खाणकामामुळे प्रदूषणाची समस्या उदभवणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. खाणकाम पूर्णपणे प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वाहने वापरून केले जात आहे. यासह, ऑस्ट्रेलियातील मायनिंग युनिव्हर्सिटी सोबत गोंडवाना विद्यापीठाने करार केला आहे.