---Advertisement---

व. वा. वाचनालयात बाल-युवा ग्रंथालय विभाग कार्यान्वित, वर्धापन दिनानिमित्त 1 जुलैला राजीव तांबे यांच्या हस्ते उद्घाटन, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

जळगाव : राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारप्राप्त 148 वर्षे जुन्या वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयातर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून 1 जुलैला बाल व युवा ग्रंथालय विभागाचे उद्घाटन सुप्रसिद्ध बालसाहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ राजीव तांबे यांच्या हस्ते होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष सीए अनिलकुमार शाह यांनी दिली.

शहरातील वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयात मंगळवारी (24 जून)पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष शाह यांच्यासह ग्रंथपाल अनिल अत्रे उपस्थित होते.

---Advertisement---

कार्याध्यक्ष शाह यांनी सांगितले की, शहराच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात सतत सक्रिय राहणारे वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बदलत्या काळानुसार बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून वाचनालयातील ग्रंथांचे संपूर्ण संगणकीकरण केले आहे. ग्रंथालयातील पुस्तक देवाणघेवाणही संगणकावरच होत आहे. वाचनालयाची वर्गणी व देणगी ऑनलाइन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


बाल व युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना चांगल्या वाचन साहित्याची चांगल्या पुस्तकांची ओळख व्हावी, त्यांनी चांगले वाचन साहित्य वाचावे आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा आणि त्यातून राष्ट्राची भावी पिढी निर्माण व्हावी, या हेतूने आर. जी. मानुधने फाउंडेशन फॉर एक्सलन्स (मुंबई) या संस्थेने वाचनालयास दिलेल्या पन्नास लाखांच्या भरीव देणगीतून बाल व युवा ग्रंथालय विभागाच्या सुसज्ज ग्रंथदालनाची उभारणी वाचनालयाने केली असून, त्यात विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर बाल व विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व प्रकारच्या विविध विषयांवरील साहित्यही या ग्रंथालयात उपलब्ध असतील.

वाचनालयाच्या 148 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जुलै रोजी (स्व.) रा. ग. मानुधने बाल व युवा ग्रंथालय विभागाचे उद्घाटन सुप्रसिद्ध बालसाहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ राजीव तांबे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. याच अनुषंगाने वाचनालयाने ‌‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर अनोखी स्पर्धा घेतली असून, स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आकर्षक ग्रंथभेटीबरोबरच राजीव तांबे यांच्या 1 जुलै रोजी होणाऱ्या लेखन कार्यशाळेत सहभागी होता येईल, तसेच या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना नव्या ग्रंथालय विभागात लावण्यात येणाऱ्या अनोख्या सामूहिक चित्रात स्वत:च्या बोटाचा ठसा उमटवून नाव राखण्याची संधीही दिली जाणार आहे. 2 जुलै रोजी राजीव तांबे यांच्यासोबत पालकांसाठीही कार्यशाळा वाचनालयातर्फे होणार असून, त्याचा लाभ पालक व शिक्षकांनी घ्यावा, हा उद्देश आहे.

28 जूनला ‌‘हसू या बाहुल्यांसंगे’ कार्यक्रम


दरम्यान, वाचनालयातर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून 28 जूनला सत्यजित पाध्ये यांचा ‌‘हसूया बाहुल्यांसंगे’ हा कार्यक्रम ला. ना. विद्यालयाच्या भय्यासाहेब गंधे सभागृहात होणार आहे. या खुल्या असलेल्या कार्यक्रमास जळगावकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही कार्याध्यक्ष अनिलकुमार शाह यांनी केले.

‌‘मी वाचले पुस्तक, तुम्ही कधी वाचणार?’


बाल व युवा ग्रंथालय विभागात वर्षभर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम शहरातील मान्यवरांच्या सहकार्याने राबविण्याची योजनाही वाचनालयाच्या विचाराधीन आहे. मुलांसाठी ‌‘मी वाचले पुस्तक, तुम्ही कधी वाचणार?’ असा सेल्फी पॉइंट उभारणीचे नियोजन आहे. अशा या आगळ्यावेगळ्या उपक्रमात शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक व रसिक वाचकांनी सहभागी होऊन ग्रंथालयास सहकार्य करावे, असे आवाहनही वाचनालयाने केले आ

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---