मनपा लाच प्रकरण : रचना सहाय्यक मनोज वन्नेरेचे निलंबन

जळगाव : महापालिकेतील लाच प्रकरणात नगर रचना सहाय्यक मनोज वन्नेरे यास ९ डिसेंबर रोजी लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली. महापालिकेतील एका बांधकामाच्या परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वन्नेरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. महापालिकेच्या आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे, आणि पुढील आदेश होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे.

खेडी बुद्रुक येथील नागरिकास बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी परवानगीसाठी नगर रचना विभाग मनपा येथे एकूण 3 प्रकरणे दाखल केली आहेत. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी पाठवले असता नगर रचना सहाय्यक मनोज समाधान वन्नेरे याने याने पहिल्या प्रकरणात 21 हजार व तडजोड अंती 15 हजार व व दुसऱ्या प्रकरणात 15 हजार रुपयाची आयुक्त, मनपा जळगाव व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार ) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांचेसाठी एकूण 30 हजाराची मागणी करून पहिल्या प्रकरणात 15 हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. यात आयुक्तांना आठ हजार आणि नगर रचनाकार यांना चार हजार रुपयांची मागणी करत होते, उरलेले पैसे ते स्वतः घेणार होते. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचून वन्नेरे यांना रंगेहाथ पकडले.  ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोना किशोर महाजन, राकेश दुसाने यांच्या पथकात समावेश होता.

दरम्यान, तक्रारदारांच्या तक्रारीनुसार एसीबीने चौकशी केली आणि वन्नेरे यावर महापालिकेच्या आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सेवेतून निलंबित केले आहे, आणि पुढील आदेश होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे.