---Advertisement---

जळगाव बसस्थानक परिसरात काँक्रिटीकरण; जूनअखेर होणार काम पूर्ण

---Advertisement---

जळगाव : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक (नवे स्टॅण्ड) परिसराचे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर फलाट आणि बसेससाठी वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. प्रगतीपथावर असलेले काँक्रिटीकरण जूनअखेर पूर्णत्वास येणार असून लवकरच वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल. काम सुरू असल्याने गेल्या महिना-दीड महिन्यापासून बसगाड्यांचे प्रवेशद्वार बंद होते. मात्र आता वाहतुकीस होणारा अडथळा दूर होणार आहे.


जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानक परिसराचे नूतनीकरण व काँक्रिटीकरणाचे काम एमआयडीसीअंतर्गत साडेतीन कोर्टीच्या निधीतून केले जात आहे. आतापर्यंत भुसावळ, मुक्ताईनगर, यावल व रावेरकडे जाणाऱ्या बस फलाटांकडील सुमारे निम्मेच्यावर काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तसेच वाहनतळाच्या पुढील भागात आगारामधील काँक्रिटीकरण करण्यात येऊन बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बंद असलेले प्रवेशद्वार लवकरच सुरू केले जाणार आहे.

गैरसोय होणार दूर

बसस्थानकात फलाटांचे कोपरे तुटक्या अवस्थेत असून यातील लोखंडी सळ्यांचा सांगाडा काही ठिकाणी उघडा पडलेला होता. तसेच पावसाळ्याच्या दिवसात जागोजागी साचणाऱ्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या माध्यमातून सुमारे साडेतीन कोटीच्या निधीसह महामंडळाच्याच अभियंत्यांच्या देखरेखीत बसस्थानकातील रस्ते काँक्रिटीकरण केले जात आहे. याम ळे प्रवाशांचीही गैरसोय कायमची दूर होणार आहे.

जळगाव मध्यवर्ती बसस्थानक पूर्वी दोन भागात विभागलेले होते. एका बाजूने मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, धुळे, सुरत, अंकलेश्वर आदी भागात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तर दुसरीकडे भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, चिखली, बुलडाणा, शेगाव, अमरावती आदी पूर्व भागाकडे जाणाऱ्या बसेस असे दोन भाग होते.

एकाच बाजूने २० फलाट

सद्यस्थितीत बसस्थानक पुनर्विकासांतर्गत करण्यात येत असलेल्या काँक्रिटीकरणामुळे बसस्थानकातील फलाटाच्या रचना बदलण्यात येणार आहेत. पूर्वीच्या दोन्ही बाजूंऐवजी सर्व फलाट एकाच दिशेने असून सुमारे २० फलाट तयार होणार आहेत. जेणेकरून प्रवाशांना प्रवाशांना एकाच वेळी बसगाड्यांची सुविधा दिसून येणार आहे.
मौल्यवान वस्तूंच्या चोरीवर नियंत्रण जळगाव बस स्थानकावरून दररोज सुमारे हजारो प्रवासी प्रवास करीत आहेत. दरम्यान फलाटावर गाडी लागतेवेळीच प्रवाशांच्या मौल्यवान चीजवस्तू, दागदागिने, मोबाइल आदी वस्तूंच्या चोरीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. कॉक्रिटीकरणाची मुदत तीन महिने बसस्थानकातील कॉक्रिटीकरण एमआयडीसीअंतर्गत उपलब्ध साडेतीन कोटींच्या निधीद्वारे केले जात आहे. काँक्रिटीकरणाच्या कामाची मुदत तीन महिने असून एमआयडीसी अभियंत्यांच्या देखरेख व नियोजनासह मक्तेदाराच्या माध्यम ातून एप्रिलपासून काँक्रिटीकरण केले जात आहे.


बसस्थानक इमारतीचा पुनर्विकास बीओटी तत्त्वावर केला जात आहे. गांधी उद्यानाकडील बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूकडे कार्यालयीन इमारत बांधकाम होणार आहे. त्यामुळे तेथे कॉक्रिटीकरणाऐवजी बस आगारातील परिसराचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. जळगाव बस आगार पांझरापोळ नजीकच्या एसटी वर्कशॉपच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येणार आहे.

एमआयडीचे साहाय्यक अभियंता विपीन पाटील यांनी सांगितले की, बसस्थानकातील काँक्रिटीकरणाचे जवळजवळ ५० टक्के काम झाले आहे. इमारत आणि अन्य कामे तसेच आगार परिसरातील काँक्रिटीकरण आदी कामे जूनअखेरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहेत. बसस्थानकात एकेरी बाजूचा प्रवेश आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन या समस्येच्या निराकरणासाठी बंद प्रवेशद्वारदेखील लवकरच वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल.


---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment