जळगाव : प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम PMJVK अंतर्गत जळगाव जिल्ह्यात संविधान भवन गट नंबर 220 /1 पिंप्राळा हुडको येथे तयार करण्यात यावे अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन मंगळवार, ८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना देण्यात आले.
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम पुरस्कृत योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये ‘संविधान भवन’ तयार करण्याचा प्रस्ताव जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने PMJVK मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘संविधान भवनासाठी ‘ जळगाव उपनगर पिंप्राळा हुडको येथे किमान सात 7 एकरच्या वरची जागा महानगरपालिकेची असून, अशा प्रकारचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी नागपूर सारखी प्रतिकृती ह्या सात 7 एकरच्या जागेत व्हावी अशी नागरिकांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
‘संविधान भवनासाठी ‘ जळगाव उपनगर पिंप्राळा हुडको येथे महानगरपालिकेची किमान सात 7 एकर पेक्षा जास्त जागा आहे. हा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी नागपूर सारखी प्रतिकृती ह्या सात 7 एकरच्या जागेत व्हावी अशी मागणी जळगाव शहरातील नागरिकांची कित्येक वर्षापासून आहे. तरी PMJVK मार्गदर्शक तत्त्वानुसार त्या ठिकाणी अल्पसंख्यांक तसेच ,SC/ST/OBC/NT जातीची लोकसंख्या आपल्या निकषानुसार आहेत. पिंप्राळा हुडको या ठिकाणी हे’ संविधान भवन’ झाल्यास त्याचा उपयोग पिंप्राळातील हुडको परिसरातील खोटे नगर परिसर ,दादावाडी परिसर ,खंडेराव नगर, हरी विठ्ठल नगर ,वाघ नगर परिसर पिंपळा उपनगर अशा तमाम वस्तीला त्याचा उपयोग होईल. पिंप्राळा उपनगर परिसरातील लोकसंख्या एक लाख 25 हजार इतकी आहे. आणि सर्व जातीय धर्माच्या जनतेला याचा फायदा होऊ शकतो.
PMJVK मार्गदर्शकानुसार त्या ठिकाणाहून विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा जवळ असल्याने त्याचा फायदा विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे व गौतमी महिला बहुउद्देशीय संस्था जळगाव ‘संविधान भवन’ पिंप्राळा हुडको येथेच व्हावे अशी मागणी मनसे उपमहानगराध्यक्ष आशिष उत्तमराव सपकाळे, सोबत गौतमी महिला बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष संगिता मालेराव, उपाध्यक्ष सिंधुताई जाधव,सचिव ज्योती निकम, आशा सुरळके, राणी नन्नवरे,वंदना बागर,ऐयाती बाम्हणे,जयक्षी सपकाळे, जयश्री जाधव, मिना सोनवणे, निशा सुरवाडे, पुनम जाधव, वैशाली साळुंखे, मंगला सोनवणे, अपर्णा निकम, शारदा अबगड ,रेखा अवचारे आदींनी केली आहे.