---Advertisement---

Crime News : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली १३ लाखांत फसवणूक

by team
---Advertisement---

धरणगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली धरणगावातील एका तरुणाची १३ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिल्ल मशीदजवळ मोहंमद जुबेर मोहंमद युसुफ (वय २७), हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. सतीश गोकुळ पाटील, मनीषा सतीश पाटील, प्रमिला गोकुळ पाटील (सर्व रा. जुनवणे, ता. अमळनेर, जि. जळगाव), प्रवीण गोकुळ महाले (रा. पारोळा), राम नारायण नेवाळकर, अरुण (पूर्ण नाव माहीत नाही) दोन्ही (रा. नाशिक) तसेच रामकुमार (पूर्ण नाव माहीत नाही (रा. दिल्ली) या सर्वांनी संगनमत करून मोहंमद जुबेर यांना भारतीय रेल्वे खात्यात नोकरी लावून देतो, असे खोटे आमिष दाखवले.

एवढेच नव्हे तर मोहंमद जुबेर यांच्या नावाचे खोटी, बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे बनावट शिक्के म ारून इंडियन रेल्वे, असा खोटा बनावट ई-मेल पाठवून मोहंमद यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोहंमद जुबेर यांच्याकडून तब्बल वेळोवेळी एकूण १३ लाख रुपये घेतले.

परंतु आपल्याला कोणतीही नोकरी लावून दिली नाही व पैसे परत केले नाहीत, म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहंमद जुबेर यांनी धरणगाव पोलिसात धाव घेतली. तसेच संशयित आरोपितांना त्यांच्या बँक खात्यात पैसे भरण्याच्या पावत्या, संशयितांना पैसे दिल्याचे फोटो तसेच आरोपितांनी फिर्यादीस रेल्वेच्या नावाचे खोटी, बनावट तयार केलेल्या ऑर्डरची प्रत व इतर कागदपत्रेही पोलिसात सादर केलीत. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. सुधीर चौधरी हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment