मुंबई : दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या प्रिंट असलेले टी-शर्ट विकणे अनेक ई-कॉमर्स विक्रेते आणि फ्लिपकार्ट, AliExpress, Tshopper आणि Etsy सारख्या प्लॅटफॉर्म यांना महागात पडलं आहे. यासर्वांवर महाराष्ट्र सायबर विभागाने हे टी-शर्ट विकल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोईच्या प्रिंटसह टी-शर्ट विकणाऱ्या विक्रेते आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, अलीकडेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दाऊद इब्राहिम व लॉरेन्स बिश्नोईचे यांचे प्रिंट असलेले टी-शर्ट विकण्याचे प्रकार उघड झाला आहे. यात AliExpress, Flipkart, T-Shopper आणि Etsy सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि दाऊद इब्राहिमचे फोटो असलेले टी-शर्ट विकले जात होते. याप्रकरणात महाराष्ट्र गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. अशा उत्पादनांमुळे सामाजिक शांततेवर परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांनी मत व्यक्त केले आहे.
पोलिसांनी पुढे सांगितले की, गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांच्या जीवनशैलीचा गौरव करणाऱ्या उत्पादनांवर कारवाई केली जाईल. या तरुणांवर दुष्परिणाम होतात. अशा साहित्यामुळे समाजाच्या मूल्यांना हानी पोहोचते आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळते, ज्याचा तरुणांवर नकारात्मक परिणाम होतो.
या कलमांखाली नोंदवला एफआयआर
हे प्रकरण गांभीर्याने घेत महाराष्ट्र सायबर विभागाने अनेक ई-कॉमर्स विक्रेते आणि फ्लिपकार्ट, AliExpress, Tshopper आणि Etsy सारख्या प्लॅटफॉर्मवर एफआयआर नोंदवला आहे. सायबर विभागाने भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 192, 196, 353, 3 आणि आयटी कायदा, 2000 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.