जळगाव : भुसावळ तालुक्यातील एका शेतात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणांचे वय अंदाजे ३० वर्ष असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे. पोलिसांतर्फे मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात येत आहे
भुसावळ तालुक्यातील कान्हाळे शिवारात ३० वर्षीय तरुणच मृतदेह आढळून आला आहे. या शिवारात बाळू नामदेव भोळे यांची शेती असून त्यांच्या शेताशेजारी कुजलेल्या स्थितीतील तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच तालुका पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून अकस्मात मृत्यची नोंद केली आहे. दरम्यान, मयतीची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानुसार पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह भुसावळातील ट्रामा केअर सेंटर येथे रवाना केला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे हे करीत आहे.