---Advertisement---

Crime News : पाच लाखांसाठी कॉन्टेंट क्रिएटरने महिलेला संपविले

---Advertisement---

Crime News : समाज माध्यमावर लाखो फॉलोवर्स असलेल्या हरयाणातील कॉन्टेंट क्रिएटर सुखप्रीत सिंह उर्फ सुख रतिया याला मुंबई पोलिस व नोएडा एसटीएफने संयुक्त कारवाई करीत एका महिलेच्या खूनप्रकरणी अटक केली. पाच लाख रुपयांची सुपारी घेऊन नवी मुंबईत एका महिलेचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या खून प्रकरणात सुखप्रीतच्या मामाचा मुलगा गुरप्रीत सिंह देखील सामील होता.

सुखप्रीतचे इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तो मॉडेलिंग करण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र, पैशांसाठी त्याने सुपारी घेऊन एका महिलेचा खून केला. सुखप्रीत हा मूळचा हरयाणामधील फतेहबाद जिल्ह्यातील रतिया या शहरातील रहिवासी आहे. तो सुरुवातीला शिवराळ भाषेतील व्हिडीओ बनवून फेसबूक व इन्स्टाग्रामवर शेअर करत होता.

या व्हिडीओंमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने मॉडेलिंगचा व्यवसाय सुरू केला. मात्र, पंजाबमधील एका तरुणीशी झालेल्या वादानंतर २०२२ मध्ये तो हरियाणा सोडून मुंबईत पळून आला. मुंबईत तो मॉडेलिंग करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सातत्याने येणारे अपयश व आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

मुंबईत ब्युटी पार्लर व्यवसाय करणाऱ्या उत्तर प्रदेशातील महिलेने हत्येसाठी सुखप्रतीला ५ लाख रुपयांची सुपारी मिळवून दिली. त्यानंतर त्याने नवी मुंबईत एका महिलेचा खून केला आणि फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment