जळगाव: एका परजिल्ह्यातील मोटरसायकल चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तो चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत चोरट्याकडून एकूण पाच चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
रविवार, २२ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, एक इसम चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी अजिंठा चौकात येणार आहे. त्यानुसार पोलीस पथकातील विशाल कोळी, राहुल रपडे आणि इतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. सिव्हील ड्रेसमध्ये कर्तव्य बजावत असताना संशयित आरोपी दिपक प्रेमसिंग सोळंके (रा. वरठाण, ता सोयगांव जिल्हा छत्रपती संभाजी नगर) यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशी केल्यानंतर, आरोपीकडून एचएफ डीलक्स मोटरसायकल मिळाली. त्याच्या वतीने अधिक तपास करण्यात आला आणि त्याने जळगाव शहर ३ , छत्रपती संभाजी नगर १ आणि अडावद येथून १ अशा पाच मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले. या चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आरोपीला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.